खान्देशी मराठा सोयरीक संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निर्मला पाटील उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष 2022 पुरस्काराने सन्मानित.

जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निर्मला पाटील उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष 2022 पुरस्काराने सन्मानित.


      दिनांक 12 जानेवारी 2023 जिजाऊ जयंती निमित्ताने जिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे मराठा सेवा संघाच्या जिजाऊ महोत्सव सोहळ्यामध्ये डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
      ऑगस्ट 20 20 मध्ये त्यांची राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली.          जिजाऊ ब्रिगेड सांगली शहराध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, व आज प्रदेशाध्यक्ष या पदावर त्या काम करीत आहेत. मराठा सेवा संघ प्रशिक्षक, शिवधर्म शिव सेवक, लेखिका,वक्त्या म्हणून ही सामाजिक क्षेत्रांमध्ये त्या 2001 पासून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.
     ऑगस्ट 20 20 मध्ये जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली. आज अखेर त्यांच्या नेतृत्वाखाली 33 राज्यांमध्ये जिजाऊ ब्रिगेडचे कार्य सुरू झाले आहे. 2021 मध्ये 20 राज्यांमध्ये जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. 2022 मध्ये जवळजवळ 30 राज्यांमध्ये जिजाऊ जयंती अतिशय शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात  साजरी करण्यात आली आहे.
     महिला सक्षमीकरण( शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक, अध्यात्मिक ) स्त्री पुरुष समानतेचा विचार समाजामध्ये रुजविणे, महिलांच्या सुप्त गुणांना, क्षमतांना संधी उपलब्ध करून देणे, महिलांनी अज्ञान, अंधश्रद्धा यातून बाहेर पडून काल सुसंगत बदल स्वीकारणे, महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या पुढील आव्हाने या विषयावर चर्चा करणे व उपाय शोधणे अशा अनेक हेतूने राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड सध्या काम करीत आहे.
   यासाठी आधिवेशन,विविध स्पर्धा,चर्चासत्रे, व्याख्यान, समुपदेशन, संवाद दौरा, महामानवांची जयंती साजरी करून त्यांचा इतिहास समाजासमोर आणणे असे अनेक उपक्रम राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राबविले जात आहेत.
    राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे सध्या 22 कक्षांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर काम सुरू आहे. आतापर्यंतच्या त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणीने  त्यांना 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीदिनी त्यांना " *उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष 2022* " या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
    2021 मध्येही त्या याच पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या.
    मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, मराठा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजि. डॉ. विजय घोगरे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, प्रदेश महासचिव इंजि.मधुकरराव मेहेकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें